राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन
शिक्षक ध्येय, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड, हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली जिल्हा रत्नागिरी, मिलिंद दीक्षित, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे. पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २० आणि चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे.
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.
राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
A) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)
B) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)
राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
उपक्रम अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
1) उपक्रमाचे शीर्षक
2) उपक्रमाची गरज व महत्त्व
3) उद्दिष्टे
4) नियोजन
5) यशस्वीता /निष्कर्ष
6) समारोप /फायदे
7) परिशिष्टे
8) उपक्रमाची सद्यस्थिती
9) पीडीएफला (स्वत:चे नाव व गट) असे नाव द्यावे. उदा. सुनील पाटील गट A
10) स्वत: शाळेत राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र सोबत पाठवावे. प्रमाणपत्रासाठी CLICK HERE
या मुद्द्यांचा समावेश असावा.
शब्दमर्यादा 3000 शब्द असून जास्तीत जास्त 10 फोटोचा वापर करावा. अहवाल 10 एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून फक्त 9623237135 याच व्हाट्सअॅप नंबरवर व्हाट्सअॅपनेच पाठवायचा आहे. (इतर नंबरवर पाठविल्यास विचारात घेतला जाणार नाही)
शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ pdf करून पाठवावी. उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा.
उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. उपक्रम येथे पाठवा
१) 9623237135 या व्हॉट्सॲप नंबर वर उपक्रम अहवाल पीडीएफ पाठवावी.
खाली चार नमुना उपक्रम अहवाल दिलेले आहेत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
1. CLICK HERE
2. CLICK HERE
3. CLICK HERE
4. CLICK HERE
विजेत्या उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रिंट प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयची प्रिंट मासिक देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 50+ डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.
नोंदणी शुल्काचे दोन पर्याय आहेत..
- रु. 600 (वार्षिक वर्गणीसह)
किंवा
- रु. 500 (फक्त नोंदणी शुल्क)
नोंदणी शुल्क 600 किंवा 500 रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे 96 23 23 71 35 या नंबरवर पाठवावे.
पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट उपक्रम pdf च्या खाली 9623237135 या नंबरवर पाठवावा.
शिक्षक ध्येयची वार्षिक वर्गणी 500 रुपये असून त्यात पुढील वर्षभरात 52 अंक + मागील 200 अंक (असे एकूण 252+) अंक देखील शिक्षक ध्येय इंडिया या अॅपवर वाचण्यासाठी लगेच उपलब्ध होतील.
लक्षात घ्या: शिक्षक ध्येयचा संपूर्ण अंक प्रत्येक सोमवारी 153 व्हाटसएप ग्रुपवर मोफत दिला जात नाही.)
स्पर्धेचा निकाल दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी ‘शिक्षक दिनी’ राज्यातील विविध वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येईल.
राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शिक्षिका यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड, हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली जिल्हा रत्नागिरी, मिलिंद दीक्षित, वर्धा यांनी तसेच शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात येत आहे.
असा असावा उपक्रम अहवाल :
1) उपक्रम एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करुन त्याची pdf करुन पाठवावी.
2) एका शिक्षकांस दोन-तीन उपक्रम पाठविता येतील (प्रत्येकी नोंदणी शुल्क द्यावे लागेल.)
3) शब्द किंवा पाने यांची कुठलीही मर्यादा नाही. पीडीएफ 10 MB च्या आत असावी
5) अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2024 असून ती पुढे वाढविण्यात येणार नाही.
6) संपादकीय मंडळातील शिक्षक, शिक्षिका देखील यात उपक्रम पाठवून सहभागी होऊ शकता.
7) सकारात्मक विचारसरणी ठेऊन यात सर्वांनी सहभाग नोंदवावा कारण ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
8) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालण्याची सवय असणाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.
8) उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 या नंबरवर किंवा संपादकीय मंडळाशी संपर्क करावा.
9) नोंदणी शुल्क
PhonePe = 96 23 23 71 35
Google Pay = 96 23 23 71 35
द्वारे जमा करावी.
10) सर्वात महत्त्वाचे: शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉटसह आपले नाव, गट A किंवा B, आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर इ. तपशील 9623237135 या नंबरला उपक्रम पी डी एफ च्या खाली व्हाटसअॅपवर पाठवावा.
स्क्रीन शॉट न पाठविलेले उपक्रम विचारात घेतले जाणार नाही.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निकाल लागल्यानंतर वाद घालण्याची सवय असलेल्यांनी यात सहभागी होऊ नये.
शिक्षक ध्येयच्या उपसंपादिका, उपसंपादक, प्रतिनिधी यांचे कडेही आपण
प्रस्ताव आणि नोंदणी शुल्क जमा करु शकता..
आमचे राज्यस्तरीय संपादकीय मंडळ
‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार, 9623237135
कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, वर्धा 7038973645;
श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार 9158664041
कविता चौधरी, जळगाव 8806647390
मंजू वानखडे, अमरावती 9511780815
भाग्यश्री पवार, जळगाव 9890768735
श्रद्धा पवार, जळगाव 7507173163
वसुधा नाईक, पुणे 9823582116
विद्या देवळेकर रत्नागिरी 9420154899
अर्चना भरकाडे, अमरावती 9970050246
विद्या वालोकर, वर्धा 9511892722
अंजली वारकरी (राऊत), अमरावती 7350675233
अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी 8806504055
विजय अहिरे, नंदुरबार 9421538621
सुधाकर जाधव, औरंगाबाद 9552267501
कैलास बडगुजर, ठाणे 8888284265
डॉ. माधव गावीत, नाशिक 9657557198
श्री. सतीश बनसोडे, नाशिक 9850883072
आल्मेडा रॉबर्टसर पालघर 8850409911
संदिप बेलदार, नंदुरबार 9404410600
राजेंद्र लोखंडे, नाशिक 9158542985
धन्यकुमार तारळकर, सातारा 9975282869
मिलिंद दीक्षित, वर्धा 7972262333
संजय पवार, रायगड 7499513207
पुरुषोत्तम पटेल, नंदुरबार 8208841364
प्रविण घाडगे, सातारा 9503409123
कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर 9561617374
खुशाल डोंगरवार, भंडारा 7588789975
नितीन केवटे नाशिक 7218601510
प्रेमजीत गतीगंते, मुंबई ९१६७४४७८१६
संगीता पवार मुंबई 9869220963
किरण काळे पुणे 8888800745
भारती सावंत, मुंबई, 9653445835
मेघा पाटील नंदुरबार 9665189977
स्नेहा गाढे, कर्जत जि रायगड, 9527603662
पांडुरंग विष्णू दळवी, सिंधुदुर्ग, 9421189575
डॉ. म्हातारदेव निंबा म्हस्के, अहमदनगर ९४०५१०३०६०
चेतन पाटील तळोदा जि नंदुरबार 9420440181
समीर भारती, जुन्नर पुणे 9975023285
साईनाथ कनिंगध्वज तालुका जुन्नर 9420949401
सौ. संगीता म्हस्के, पुणे जिल्हा 8087934241
सतेशकुमार माळवे, सातारा ७७५८९७८७६१
तारीश अत्तार, सांगली ९४०३००७३५५
सुमैया तांबोळी, सोलापूर ९४२०६४८६१७
विठ्ठल भालेराव, गंगापूर, जि. औ. बाद 9421409054
शोभा माने, लातूर जिल्हा 9421552517
महादेव शरणप्पा खळूरे लातूर 8796665555
कविता हिंगमिरे सोलापूर 9075006189
मृगया मोरे रत्नागिरी 9422733960
वर्षा हडपसरकर, पुणे 9860483497
शीतल चौधरी मुंबई 9619943927
आदिनाथ सुतार अहमदनगर 9890709175
ज्योती परदेशी नाशिक 9420299484
उलकेशकुमार वाळूजे, औरंगाबाद 9403009449
ललित पाटील पालघर 9209516535
बशीर कुमठेकर लातूर 9763979263
राणी जाधव पुणे 9420728890
राजेश चायंदे, अमरावती ८९२८९५०७१६
अंजली कडू, अमरावती, ८००७२५११५९
अतुल पडोळे अमरावती 9421823474
डॉ. तक्षशीला मोटघरे अमरावती 9823413413
महेन्द्र भुवराज सोनेवाने, गोंदिया 9421802067
सी एच बिसेन, गोंदिया 8390678303
आनंद जाधव, हुलसुर जि. बिदर, कर्नाटक राज्य 9535503233
यांनी केले आहे.
बेस्ट ऑफ लक BEST OF LUCK